ऋतुगंध

ऋतुगंध हे सिंगापुरातल्या महाराष्ट्र मंडळाने चालवलेले द्वैमासिक. वर्षातल्या सहा ऋतुंप्रमाणे त्याचे सहा अंक निघतात आणि सिंगापूरमध्ये एकच एक ऋतु असला तरी त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ऋतुपर्वांचा आनंद घेता येतो म्हणून नाव ऋतुगंध!
गेली १६ वर्षे अव्याहतपणे हा उपक्रम चालू आहे. पूर्वी तंत्रज्ञानाच्या अभावी अगदी हस्तलिखित अंकांपासून सुरु करुन आज एका ऑनलाईन ब्लॉगच्या स्वरुपात अनेक लोकांपर्यंत सहज पोचणाऱ्या रुपापर्यंत त्याचा प्रवास झाला आहे. ह्या काळात ऋतुगंधला अनेक उत्तमोत्तम संपादकमंडळी, लेखक-कवी-चित्रकारांच्या प्रतिभेचा स्पर्श झाला. अनेक जुने अंक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि लवकरच सगळे जुने अंक ह्याठिकाणी उपलब्ध होतील.
मंडळाच्या सदस्य व त्यांच्या आप्तांच्या साहित्यिक प्रतिभेला, हौसेला एक व्यासपीठ मिळवून देणे व त्यायोगे सिंगापुरात मराठी भाषेच्या संवर्धनास हातभार लावणे हे ऋतुगंधचे ध्येय आहे. आजवर मंडळाच्या मराठीप्रेमी वाचक-लेखक सदस्यांचे उदंड प्रेम ऋतुगंधला लाभले आहे आणि यापुढेही हे प्रेम मिळत राहील, वाढत राहील ह्याचा आम्हाला विश्वास वाटतो.
ऋतुगंधबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, ऋतुगंध समितीत सामील होण्याची मनिषा असल्यास किंवा ऋतुगंधमध्ये आपले साहित्य प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास rutugandha@mmsingapore.com ह्या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.
धन्यवाद!


आपली,
ऋतुगंध समिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s